Shivendraraje Bhosale 
सातारा

Shivendraraje Bhosale| भैरोबा टेकडी उद्यानासाठी ५ कोटी मंजूर

ना. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यामुळे निधीची उपलब्धता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील विविध पर्यटनस्थळे विकसित करून सौंदर्यवाढ आणि पर्यटनवाढ करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु आहे. येथील भैरोबा टेकडीचा पर्यटनात्मक कायापालट करण्यासाठी ना. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यातून ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे साताऱ्याचे चित्र पालटू लागले आहे. विविध विकासकामांना त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पायाभूत कामे मार्गी लागत आहेत. सातारा शहरातील भैरोबा टेकडी येथे नागरिक, भाविक तसेच वॉकिंग आणि फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे. या सर्वांनाच विविध सोयी सुविधा मिळाव्यात तसेच भैरोबा टेकडीचा पर्यटनात्मक कायापालट व्हावा यासाठी नगरसेवक अविनाश कदम यांनी ना. शिवेंद्रराजे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्‍यानुसार प्रस्‍ताव तयार करण्‍याच्‍या सूचना अधिकार्‍यांना केल्‍या. अधिकार्‍यांनी प्रस्‍ताव केल्‍यानंतर मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केल्‍याने निधी मंजुर झाला.

ना. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे नगर विकास विभागाने या कामासाठी 'नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेतून ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून बगीचा, दोन्ही टेकड्यांना जोडणारा एक पूल हे वेगळे वैशिष्ट्य असणारे काम केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT