Crime News pudhari photo
सातारा

Satara News: नवऱ्याला फोन का करते म्हणून ब्युटी पार्लर चालक महिलेस मारहाण

तीन महिलांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

वडूज : आपल्या नवऱ्यास फोन, मेसेज का करते? या कारणावरून चिडून जावून वडूज येथील एका तीस वर्षीय महिलेस इतर तीन महिलांनी जबरी मारहाण केली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

प्रिया ओंकार ओतारी, पुनम रोहीत कदम (दोघी रा. दहिवडी ता. माण ) व नकुसाबाई अंकुश शिंगाडे (रा. मांडवे ता.माळशिरस जि. सोलापूर) अशी संशयित महिलांची नावे आहेत. बुधवार दि. २४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ड्रायर मशिन ठेवण्याच्या स्टिलच्या स्टॅण्डने तसेच हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

पोनि घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनासाठी महिला पोलिस नाईक पी. एल. जगदाळे व महिला पोलिस हवालदार ए. एस. काळभोर तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT