सातारा

Satara Accident: बदेवाडीत मालट्रकचा अपघात; पाईप रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत

तब्बल 10 तास वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

भुईंज : महामार्गावर दररोज वाहनांचे अपघात होत असतात. परंतु, शुक्रवारी मध्यरात्री बदेवाडी गावानजीक महामार्गावरील खड्ड्यात मालट्रक आपटल्याने चालकाचा ताबा सुटला व मालट्रकमधील लोखंडी पाईप महामार्गावर पडल्याने तब्बल 10 तास वाहतूक विस्कळीत होती. यामुळे पुणे ते सातारा वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्यात आली होती.

शुक्रवारी मध्यरात्री एक माल ट्रक महामार्गावरून जात असताना बदेवाडी गावच्या हद्दीत खड्ड्यात आदळला. यामुळे ट्रक घेवून निघालेल्या सर्व लोखंडी पाईप्स महामार्गावर पडल्या. मध्यरात्री हा अपघात झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. स्थानिकांनी चालकाला केबिन बाहेर काढत मदत केली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर सपोनि पृथ्वीराज ताटे व कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळवली. पाईप्स हटवण्याचे काम दुपारपर्यंत सुरू असल्याने 10 तास वाहतूक सर्व्हिस रस्त्यानेच सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT