Satara News | आझादपूरमध्ये विहिरीत पडून युवकाचा मृत्यू File Photo
सातारा

Satara News | आझादपूरमध्ये विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

तोल जाऊन पडला पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : आझादपूर (ता. कोरेगाव) येथील गुजरडोह नावाच्या शिवारात काम करत असताना पाय घसरून पडल्याने युवा ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोखंडी प्लेट आणण्यासाठी गेल्यानंतर सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने शोधकार्य राबवत 55 फूट खोल विहिरीतून ठेकेदार युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

विलास अशोक चव्हाण (वय 22) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आझादपूर (ता. कोरेगाव) येथे एका शेतकर्‍याच्या विहिरीवर सिमेंटची रिंग टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विलास अशोक चव्हाण या ठेकेदाराने घेतले आहे. या कामावर स्वतः चव्हाण व इतर कामगार काम करत आहेत. सर्वजण हे विजयपूर जिल्ह्यातील आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीवर आरसीसी रिंग टाकण्याचे काम सुरू होते. विलास चव्हाण व अन्य एक युवक तिथे काम करत होता. लोखंडी प्लेट आणण्यासाठी विलास चव्हाण विहिरीकडे गेला असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला.

त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकार्‍याबरोबरच विहीर मालकाने पाण्यात उडी घेतली, मात्र तोपर्यंत चव्हाण विहिरीच्या तळापर्यंत खाली गेला होता. विहीर मालकाने गावातील युवकांना माहिती दिल्यानंतर अनेकांनी विहिरीत उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विलासचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सला पाचारण केले. सोमवारी रात्री उशिर झाल्याने शोधकार्य राबवण्यात अडथळे आले. मात्र, मंगळवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर विलासचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT