सातारा

सातारा : एटीएम फ्रॉड करणार्‍या टोळीला अटक

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ठिकठिकाणीच्या एटीएम मशिनमध्ये इतर एटीएम कार्डद्वारे अडथळा आणून तांत्रिक पद्धतीने आतापर्यंत सातारा जिल्ह्यातून 3 कोटी 50 लाख रुपये काढून बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. सातारा पोलिसांनी उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये जाऊन ही कारवाई करत संशयितांकडील 86 लाख रुपयांची रक्कमही गोठवली आहे. सातारा पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे. आनंद कुमार, धर्मेंद्र कुमार, गोविंद सिंह, निरज निषाद (सर्व रा.कानपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील म्हसवड, वडूज, दहिवडी, सातारा, तसेच धायरी (पुणे) व कामोठे (रायगड) या जिल्ह्यातील विविध एटीएममधून चोरट्यांनी एटीएम मशिनमधून हजारो, लाखो रुपयांची रक्कम अलगद काढून फसवणूक केली होती. हा सर्व घटनाक्रम साधारण दोन महिन्यांमधील आहे. पैशांचा घोळ होत असल्याचे बँकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली असता काही जणांनी खाते काढून ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. यामुळे संबंधित बँकांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधला.

याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार एटीएमद्वारे संशयितांनी एकट्या सातारा जिल्ह्यात 3 कोटी 37 लाख 72 हजार 500 रुपयांचा बँकांना चुना लावलेला आहे. तपासांनतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील व देशभरातील किती बँकांना चुना लावलेला हे तपासात समोर येईल. दरम्यान, म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबी पथकानेही तपासाला सुरुवात केली. गेली काही दिवस तांत्रिक तपास सुरु असताना संशयित कानपूर येथे असल्याचे समोर आले. सातार्‍यातून कानपूरमध्ये जाऊन पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी संशयितांकडून 4 मोबाईल, विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडत असतानाच संशयितांच्या बँक खात्यांमध्ये जी रक्कम आहे त्या बँकांना पत्रव्यवहार, ई मेल करुन बँकेतील रक्कम गोठवण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, एलसीबीचे पोनि अरुण देवकर, सायबरचे पोनि सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, फौजदार विशाल भंडारे, पोलिस अमित झेंडे, अजय जाधव, रविंद बनसोडे, नितीन धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT