Ganpati Art : सुपारीवर साकारले संपूर्ण 'अष्टविनायक' Pudhari
सातारा

Ganpati Art : सुपारीवर साकारले संपूर्ण 'अष्टविनायक'

डॉ.संदीप डाकवे यांची थक्क करणारी कलाकृती

पुढारी वृत्तसेवा

तळमावले : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कलाकार डॉ. संदीप डाकवे यांनी अवघ्या ३ सेमी व्यास आणि २ सेमी उंची असलेल्या छोट्याशा सुपारीवर केवळ १ बाय १ सेमी या अत्यंत सूक्ष्म आकारात संपूर्ण अष्टविनायक रेखाटण्याची किमया साधली आहे. त्यांच्या या अद्वितीय सूक्ष्म कलेचे (मायक्रो-आर्ट) सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

सूक्ष्म कलेमध्ये विशेष हातखंडा असलेल्या डॉ. डाकवे यांचा कलाप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. सुपारीवर अष्टविनायक साकारण्यापूर्वी त्यांनी खडू, मोरपीस आणि अगदी तांदळाच्या दाण्यावरही अष्टविनायकाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. अत्यंत एकाग्रता, संयम आणि अचूकतेची मागणी करणाऱ्या या कलेत त्यांनी कमालीचे प्राविण्य मिळवले आहे. डाकवे यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT