सातारा : सातार्‍यात झालेल्या अपघातात दुचाकीचा चक्काचूर होवून एकाचा मृत्यू झाला. Pudhari File Photo
सातारा

सातार्‍यात अपघातात युवकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जुना आरटीओ चौक परिसरातील कूपर कॉलनी गेट परिसरात मुख्य रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात ओमकार मच्छिंद्र थोरात (वय 23, रा. संगमनगर, सातारा) या युवकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. राहूल चव्हाण (रा. मसूर ता.कराड) व दिग्विजय कणसे (रा.वर्णे ता.सातारा) असे अपघातात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. दरम्यान, अपघात प्रकरणी ट्रक चालक सुनील प्रल्हाद जगदाळे (रा.जगदाळे वाडा, ता.खटाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. दुचाकीवरुन तिघेजण जात असताना दोन्ही वाहने समोरासमोर आली. यामध्ये ट्रक चालकाने निष्काळजीने वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात ओमकार थोरात याला गंभीर दुखापत झाली तर अन्य दोघेजण जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ओमकार थोरात याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती तिघांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यातील ओमकार थोरात याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, अपघाताची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करत पंचनामा केला. रुग्णालयात धाव घेवून जखमींची माहिती घेतली. रात्री उशीरा ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT