सातारा

Satara Accident News: बदली ड्रायव्हर गेला अन्‌‍ जीवाला मुकला

नवले पुलावरील अपघातात लोणीच्या रोहितचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा
पंकज नेवसे

शिरवळ : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू व 20 पेक्षा अधिक जखमी झाले. यामध्ये खंडाळा तालुक्यातील लोणी गावचा रोहित ज्ञानेश्वर कदम (वय 26) याच्यावर काळाने घाला घातला. भरधाव गाडीने टेम्पोला धडक दिल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. यामुळे लोणी गावावर शोककळा पसरली आहे.

रोहित कदम टेम्पोवर चालक म्हणून काम करत होता. या दिवशी हा गाडीवर जाणार नव्हता. मात्र बदली चालक म्हणून तो गाडीवर गेला आणि पुढे मुंबईकडे जाताना कंटेनरने धडक दिल्याने रोहित कदम हा जागीच ठार झाला. यामुळे गावात शोककळा पसरली.

रोहित हा एकुलता एक मुलगा होता. गुरूवारी रोहितची गाडीवर जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, कॉनटॅक्टमधील एकाने बदली चालक म्हणून जाण्याचा आग्रह केला. घरची परिस्थिती बेताची असल्याने रोहित बदली टेम्पो चालक म्हणून गेला. नवले पुलावर झालेल्या अपघात वाहनांचा अपघात झाला. यामध्ये कंटेनरने रोहितच्या टेम्पाला धडक दिल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली.

घरातील कर्ता मुलगा गेल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रोहितचे वडील ज्ञानेश्वर कदम हे छोटे व्यावसायिक असून त्यांनी कर्ज घेऊन नवीन घराचे बांधकामाचे कामे पूर्ण केले आहे. अशातच कमावता रोहितचा अपघातात मृत्यू झाल्याने या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. या घटनेमुळे लोणी गावावर शोककळा पसरली असून शुक्रवारी रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT