Satara Accident: जळव घाटातील अपघातात महिलेचा मृत्यू  Pudhari
सातारा

Satara Accident: जळव घाटातील अपघातात महिलेचा मृत्यू

देवदर्शनासाठी जाणारे 19 भाविक जखमी

पुढारी वृत्तसेवा

तारळे : जळव घाटातील (ता. पाटण) अवघड वळणावर पिकअप गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणारे अन्य 19 जण गंभीर जखमी आहेत. जानाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना मंगळवारी हा अपघात झाला असून सर्व जखमींवर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वंदना विठ्ठल काकडे (वय 55, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुलोचना किरण शिंदे (45), पंढरीनाथ बबन काकडे (35), विठ्ठल दिनकर काकडे (55), लता राजेंद्र खरात (50), किरण किसन शिंदे (48), विद्या सोमनाथ काकडे (45), प्रभावती एकनाथ काकडे (75), शालन नानासोा खाताळ (50), केशव ज्ञानबा जगदाळे (83), छाया गणेश खताळ (40), रुक्मिणी प्रल्हाद काकडे (62), आबाजी बापूराव खताळ (76), दाजीराम गणपती खताळ ( 80), सिंधू चंद्रकांत शिंदे ( 60), एकनाथ राजाराम काकडे (72), शकुंतला आबाजी खताळ (62), शंकर कोंडीबा खताळ (62), शांताबाई शंकर खताळ (62) व चालक बापू संभाजी खताळ (36) अशी जखमींची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT