सातारा

Satara Accident : पाचवड-वाई रस्त्यावर गॅसच्या ट्रकचा अपघात

पाचवड ते वाई मार्गावर कुंभारवाडी (ता. वाई) गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भारत गॅसचा ट्रक व टाटा टेम्पोची धडक होऊन दोन्ही चालक जखमी

पुढारी वृत्तसेवा

वेळे : पाचवड ते वाई मार्गावर कुंभारवाडी (ता. वाई) गावच्या हद्दीत मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भारत गॅसचा ट्रक व टाटा टेम्पोची धडक होऊन दोन्ही चालक जखमी झाले. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्‍यात नोंद करण्‍याचे काम सुरू होते. चंद्रकांत कांबळे (वय ५८, रा. वाई) व अशोक वसंतराव मोहिते (वय ५२, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी जखमी चालकांची नावे आहेत.

भारत गॅसची गाडी (एम.एच ११ एएल ३८८३) वाईकडून येत होती, तर टेम्पो (एम.एच ११ डीए ६६३१) पाचवडकडून वाईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वाहनांचे नुकसान झाले. ज्‍या वाहनात गॅस होते त्‍या वाहनाला आग लागली नाही, अन्‍यथा मोठी दुर्घटना घडली असती.

गॅस गाडीतील भरलेल्या गॅस टाक्यांमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित विभागाला पाचारण केले. त्यानंतर गॅसच्या टाक्या दुसऱ्या गाडीत सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आल्या. टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालक अशोक मोहिते यांना सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी तोडरमल व कुंभार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने केबिन सरळ करून बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT