लोणंद: कापडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद ते फलटण रोडवरील आळंदी ते पंढरपूर बायपास तिकाटणे येथे पुण्याकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
रामरजत इंद्रकुमार गौंड (रा. उत्तरप्रदेश) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कापडगाव हद्दीत लोणंद ते फलटण रस्त्यावर हा अपघात झाला. रामसागर आनंदकुमार गौंड व रविकुमार गौंड दोघे (रा. उत्तर प्रदेश) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी मनोज कुमार गौड यांच्या फिर्यादीवरून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.