accident News Pudhari
सातारा

Satara Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत डिस्कळचा दुचाकीस्वार ठार

डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला.

पुढारी वृत्तसेवा

खटाव : पुसेगाव-फलटण राज्य मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. महेंद्र जालींदर माने (वय ४०, रा. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ५ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महेंद्र माने हे आपल्या मोटरसायकलवरून (क्र. एमएच ११ बीएम ६४७६) पुसेगाव-फलटण रस्त्याने डिस्कळच्या दिशेने येत होते. डिस्कळ गावच्या हद्दीतील गाव ओढ्याजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने महेंद्र यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महेंद्र माने यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात त्यांच्या मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भात मृत महेंद्र यांचे चुलते अविनाश सिताराम माने यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT