Accident file photo
सातारा

Satara Accident : दहिवडी-फलटण मार्गावरील अपघातात युवक ठार

दहिवडी-फलटण मार्गावरील वडगाव येथील लोणारबाबा परिसरात इनोव्हा आणि ईर्टिगा या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

दहिवडी : दहिवडी-फलटण मार्गावरील वडगाव येथील लोणारबाबा परिसरात इनोव्हा आणि ईर्टिगा या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मोगराळे, ता. माण येथील रेहमान शेख (वय ३०) हा युवक जागीच ठार झाला तर अन्य चार जण जखमी झाल्याची प्राथमिक पोलिसांनी दिली.

दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इनोव्हा वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेहमान शेख यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर चार जखमींना तातडीने दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातातील सर्व जण मोगराळे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT