Accident Pudhari
सातारा

Satara Accident: लोणंद-फलटण रस्त्यावर बस व दुचाकीच्या धडकेत एक ठार

लोणंद-फलटण रस्त्यावर एका हॉटेलसमोर एस.टी. बस व दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : कापडगाव, ता. फलटण येथील हद्दीत लोणंद-फलटण रस्त्यावर एका हॉटेलसमोर एस.टी. बस व दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. अमोल मनोहर बोडरे (वय 33, रा. तडवळे, ता. फलटण) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे. एस.टी. बस ही फलटणहून लोणंदकडे येत होती. यावेळी विद्यार्थ्यांना जेवणासाठी घेऊन जाण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या हॉटेलकडे वळण घ्यायचे होते. मात्र, बस चालक संदीप आसाराम शिरसाठ (वय 35, रा. हडपो नवनाथनगर, ता. छत्रपती संभाजीनगर) याने कोणतेही इंडिकेटर अथवा इशारा न देता अचानक बस वळवली. याचवेळी स्कूटीवरून निघालेले अमोल बोडरे यांची बसला धडक बसली. यामध्ये बोडरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी मारुती भंडलकर (रा. तडवळे) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात एस.टी. बस चालक संदीप शिरसाठ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT