सातारा

Satara Water Crisis : जिल्ह्यातील ५३ गावे व २८९ वाड्या तहानलेल्या

४४ टँकरने पाणीपुरवठा : आणखी टँकर वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात ५३ गावे २८९ वाड्या-वस्त्यांवर ४४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे गावोगावी आणखी पाण्याचे टँकर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाने हुलकावणी दिली असल्याने जिल्ह्यातील ग्रामीणसह शहरी भागात पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी, नदी, नाले व बंधारे, तलावामधील पाणी पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना गावोगावी धावपळ करावी लागत आहे. संबंधित विभागांनी टंचाईग्रस्त भागात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, शिरताव, कारखेल, धुळदेव, भाटकी, पर्यंती, पिंगळी बु., मार्डी, इंजबाव, भालवडी, खुटबाव, विरळी, कुरणेवाडी, शेनवडी, बनगरवाडी, पानवण, वरकुटे मलवडी, वारूगड, परकंदी, टाकेवाडी, सुरूपखानवाडी, शिंदी बु., कोळेवाडी, उकिर्डे, दोरगेवाडी, कुकुडवाड असे मिळून ४२ गावे व २४८ वाड्या-वस्त्यांमधील ५८ हजार ६१ नागरिक व ४६ हजार ३५४ जनावरांना ३८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यातील मोराळे, मरडवाक, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, गारवडी (आवळेपठार) पडळ, पळसगाव असे मिळून ९ गावे ३९ वाड्या-वस्त्यांमधील ९ हजार ७२४ नागरिक व ३ हजार १५५ जनावरांना ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, गोळेगाव असे मिळून २ गावे व २ वाड्यांमधील १ हजार ३७२ नागरिक व ४५ जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टँकर भरण्यासाठी जिल्ह्यातील माण तालुक्यातील १० विहीर व ६ कूपनलिका, खटाव तालुक्यातील ४ कूपनलिका अधिग्रहण केल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT