(Pudhari File Photo)
सातारा

Satara News: जिल्ह्यातील १०८ गृह प्रकल्प लॅप्स; महारेराचा दणका

बिल्डर लॉबीत खळबळ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील सुमारे १०८ बांधकाम गृह प्रकल्पांना लॅप्स घोषित करत महारेराने कठोर भूमिका घेत दणका दिला. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नियोजित कालावधीत प्रकल्प पूर्ण न करणे, मुदतवाढ (एक्स्टेंशन) न घेणे तसेच तिमाही प्रगती अहवाल (क्यूपीआर) सादर न करणे या प्रमुख कारणांमुळे हे प्रकल्प लॅप्सच्या यादीत टाकले आहेत.

कौस्तुभ राजेंद्र शहा यांचे संगम गार्डन, मे. ओंकार डेव्हलपर्सचे मिहीर हाईटस्‌, रॉयल फँटसी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सिद्धिविनायक टॉवर, एसडीआर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मनोमय रेसिडेन्सी, साई १४ डेव्हलपमेंटस्‌चे ॲक्वा विदा, श्री साईनाथ डेव्हलपर्सचे श्री साईनाथ, अभिश्री लँडमार्क यांचे अभिश्री इन्क्लेव, श्री साई डेव्हलपर्सचे हेरंब रेसिडेन्सी, मंगेश मधुकर देशपांडे यांचे शार्दुल होम्स, ओम साई असोसिएटस्‌ यांचे ओम शहा टॉवर्स, मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे आनंदराज्यम फेज १ (खंडाळा), जीएसके डेव्हलपर्सचे गजानन हाईटस्‌ (फलटण), अलायन्स वनश्री व्हेंचर्सचे वूडविंडस्‌ फेज १ (खंडाळा), सोनारी डेव्हलपर्सचे नक्षत्र सिटी (खंडाळा), ब्लू फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे नेचर्स ब्लॉसम (जावली), शिंदे-जाधव डेव्हलपर्स अँड डेव्हलपर्सचे शाहू रेसिडेन्सी (सातारा), देसाई ब्रदर्सचे पांडुरंग संकुल (कराड), मीनाक्षी शंकरराव माळी यांचे सिद्धगणेश रेसिडेन्सी (सातारा),

शंकर रामचंद्र लोखंडे यांचे सृष्टी अपार्टमेंट (सातारा), अमोद रमेश्चंद्र वाघ यांचे चैतन्य प्रथमेश (खंडाळा), बिल्डवेल बिल्डर्सचे व्हॅली ह्यू (वाई), नाथ पाटील रिअलटर्सचे ऑक्सीमूर हब (कराड), श्री वास्तूनिर्मिती लँडमार्क प्रा. लि. वास्तूनिर्मिती लँडमार्क फेज २ (वाई), अष्टविनायक कन्स्ट्रक्शनचे विघ्नहर्ता हाईट (सातारा), नोबल सागर कन्स्ट्रक्शनचे नोबल सागर रेसिडेन्सी (सातारा), गर्व लँड डील प्रा. लि. चे फलटण मेगासिटी रेसिडेन्शीयल (फलटण, अष्टविनायक कन्स्ट्रक्शनचे वरद विनायक रेसिडेन्सी (सातारा), एस.के. डेव्हलपर्सचे पारिजात रेसिडेन्सी (खंडाळा), प्रणीत दिलीप पिसाळ यांचे साई रेसिडेन्सी (वाई), अभिजित कागे यांचे अरिष्ण (खंडाळा), अरुण तात्याबा जांभळे यांचे साई सिटी बी विंग (कराड), बांदेनवाज मोहंमद मुल्ला यांचे गॅलेक्सी रेसिडेन्सी (कराड), सोनारी डेव्हलपर्सचे नक्षत्र सिटी २ (खंडाळा), प्रशांत भरत जाधव यांचे शिवनेरी रेसिडेन्सी (खटाव),

उत्कर्ष डेव्हलपर्सचे उत्कर्ष सदन (फलटण), धनलक्ष्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे धनलक्ष्मी रेसिडेन्सी (खंडाळा), घाडगे-मोहिते असोसिएटस्‌चे श्री साई हाईटस्‌ (वाई), भाडळकर अँड डेव्हलपर्सचे श्री साई हाई‌टस्‌ (वाई), दिनेश किसन जाधव यांचे दुर्गेश्वरी अपार्टमेंट (सातारा), एस. एन. डेव्हलपर्सचे लेक पॅलेस (खंडाळा), हर्ष इन्फ्रा यांचे हर्षमधुराज संकुल (सातारा) आदी प्रकल्पांचा समावेश महारेराने लॅप्स गृह प्रकल्पांच्या यादीत केला आहे. ही यादी २०२४ ची असून ती अद्ययावत केल्याचे दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT