कोरेगाव : सासुर्वे (ता. कोरेगाव) येथील जवान हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे (वय 40) यांना शनिवारी अरुणाचल प्रदेश येथे चीनच्या सीमारेषेजवळ कर्तव्य बजावताना वीरमरण आले.
प्रवीण वायदंडे हे महार रेजिमेंट, 22 इन्फंट्री ब्रिगेडमध्ये कार्यरत होते. शनिवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना वीरमरण आले. वीर जवान प्रवीण वायदंडे यांच्या पश्चात पत्नी दीक्षा ऊर्फ दीपाली, तेजस व प्रज्वल अशी दोन लहान मुले, वृद्ध आई, भाऊ असा परिवार आहे. वीर जवान प्रवीण वायदंडे यांचे पार्थिव रविवार, दि. 17 रोजी सासुर्वे येथील त्यांच्या गावी पोहोचणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.