संशयितांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी Pudhari File Photo
सातारा

Satara Fraud : संशयितांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

अमेरिका कॉल सेंटर प्रकरण : तयार स्क्रिप्टला इंग्रजी तडका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोरेगाव येथे कॉल सेंटर थाटून थेट अमेरिकन नागरिकांना डिजीटल अरेस्टसह ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) तपासाला सुरुवात केली असता फसवण्यासाठी तयार स्क्रिप्टला संशयित इंग्रजी तडका देत होते, असे तपासात समोर आले आहे.

सागर हरिश्चंद्र सुर्यवंशी (वय 33, रा. मानखुर्द पश्चिम मुंबई) हा कॉल सेंटर मालक आहे. विरेंद्र विनोद बोडरे (वय 27, रा.गोवंडी, मुंबई), अक्षय रामचंद्र भंडारी (वय 28, रा. गोवंडी मुंबई), मनिष दिनेश जोशी (वय 28), रितेश चंद्रेश चौहान (वय 26, रा. नालासोपारा, मुंबई) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्या टोळीचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी एलसीबी पथकाला कोरेगावात बेकायदा कॉल सेंटरमधून फसवणूक होत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन तेथे छापा टाकला. याठिकाणाहून अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने फसवले जात असल्याचे समोर आले. सातारा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तब्बल 36 लाखांची रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणात संशयितांची धरपकड करुन 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पाच जणांचा ठगवण्यासाठी महत्वाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, बहुतांशी संशयितांचे शिक्षण जेमतेम आहे. मात्र तरीही अमेरिकन नागरिकांना अस्खलित इंग्रजी बोलून फसवले जात होते. फसवणुकीसाठी कॉमन ठरलेली काही स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट समोर ठेवून फाडफाड इंग्रजी हाणली जात होती. त्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिका एकच आहे. संशयितांपैकी पाचजण या टोळीचे प्रमुख म्होरके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT