सोनगाव येथील कचरा डेपोतील आग प्रकरण  
सातारा

Satara News : सोनगाव कचरा आग प्रकरणी एफआयआर

पुनीत शिसोदियावर गुन्हा; नगरपालिकेची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा नगरपालिकेच्या सोनगाव (ता. सातारा) येथील कचरा डेपोला आग लागून गेली चार दिवस सुरू असलेल्या काथ्याकूटप्रकरणी अखेर शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर पुनीत शिसोदिया याच्या विरुद्ध सातारा पालिकेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश दत्तात्रय गलायल (वय 52, रा.सातारा) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत.

पालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 9 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता सोनगाव ता. सातारा येथे आग लागली. येथील घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प असून तेथे आग लागून धुराचे मोठे लोट पसरले होते. सातारा पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता धुरामुळे तेथे जाणे अडचणीचे झाले होते. धुरांच्या लोटामुळे रस्त्यावरील काहीही दिसत नव्हते. यामुळे अग्निशामक दलाला पाचारण केले. परंतु आगीचे व धुराचे लोट प्रचंड प्रमाणात सुरुच होते. पालिकेच्यावतीने दोन दिवस आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु राहिले. आग आटोक्यात येत नव्हती. सोनगाव डेपो प्रकरणी पालिकेने कंत्राटदारासोबत ठेका पद्धतीचा करारनामा केला आहे. या करारनाम्यातील अट क्रमांक तीनप्रमाणे दैनंदिन निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित संस्थेने योग्यप्रकारे प्रक्रिया केली नाही. यामुळे प्रकल्प परिसरात अंदाजे 20 ते 25 फूट उंचीचे कचऱ्याचे मोठे ढीग साचून राहिले होते. यातूनच त्या कचऱ्याच्या ढिगास मोठ्या प्रमाणात आग पसरली. ही आग संस्थेच्या निष्काळजीपणामुळे परसरल्याचे दिसून येत आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन सोनगाव व परिसरातील गावांमध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे मानवी जिवनास धोका निर्माण झाला. या आगीमुळे नगरपरिषद मालकीच्या कचरा डेपोमधील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामुळे इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व त्यातील पदाधिकारी जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT