मंत्री ना. जयकुमार गोरे Pudhari Photo
सातारा

Jaykumar Gore : जिल्हा बँकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावरच

शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली लढणार : ना.गोरे यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार असून, सहकारी पक्ष सोबत आल्यास त्यांचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीची प्रक्रिया सध्‍या सुरू आहे. ठराव प्रक्रिया पार पडल्‍यानंतर आता प्रारूप मतदार यादीवर हरकती मागवल्‍या गेल्‍या आहेत. त्‍यानंतर यादी अंतिम करून ऑक्‍टोबर महिन्‍यात प्रत्‍यक्षात निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, सातारा जिल्हा बँक ही संपूर्ण जिल्ह्याची महत्त्वाची संस्था आहे. निवडणूक लढवण्याबाबत सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करण्याची आवश्यकता आहे. मात्र, भाजप म्हणून आम्ही ही निवडणूक निश्चितपणे लढणार आहोत. सहकारी पक्ष आमच्यासोबत आले तर त्यांचाही विचार केला जाईल. मात्र, निवडणूक भाजपच्या चिन्हावर आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT