तटबंदीचा भाग ढासळल्याने मोठे दगड पायरी मार्गावर आले. pudhari
सातारा

Sajjangad Fort | सज्जनगडावरील तटबंदीचा आणखी एक भाग ढासळला

पुढारी वृत्तसेवा

परळी (सातारा) : किल्ले सज्जनगडावर गेल्या महिनाभरापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराजवळचा बुरूज ढासळला होता. ढासळाढासळीचा हा सिलसिला अजूनही संपलेला नाही. बुधवारी श्री समर्थ महाद्वाराच्या वरच्या बाजूला असलेल्या तटबंदीचा भाग पायरी मार्गावर ढासळला आहे.

किल्ले सज्जनगडावर पायरी मार्गावरून गडावर पोहोचताना अंगलाई देवी मंदिराच्या रस्त्याच्या खालील बाजूस असलेल्या तटबंदीचा भाग अचानकच दुपारी ढासळला. यामुळे मोठ मोठी दगडे पायरी मार्गावर आली आहेत. या पायरी मार्गाच्या बाजूने भावीक गडावरून ये जा करत असतात. सज्जनगडाची बुरुज तटबंदी, परळी सज्जनगड पायरी मार्ग, श्री समर्थ महाद्वार, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार येथील तटबंदी तसेच धाब्याचा मारुती मंदिरच्या पाठीमागील बाजूची तटबंदी निकामी होत चालली आहे. किल्ले सज्जनगडचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT