दिवाळी सजावट साहित्य खरेदीसाठी लगबग 
सातारा

Satara News : दिवाळी सजावट साहित्य खरेदीसाठी लगबग

विद्युत माळा व रांगोळी स्‍टिकर्सना पसंती : थीम सजावटीकडे कल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दिवाळीच्या प्रकाशात घराचा प्रत्येक कोपरा उजळावा आणि सजावटीतून सणाचा आनंद खुलावा, यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पणत्या, आकाशकंदील आणि फुलांच्या माळांसोबतच रंगीबेरंगी एलईडी दिवे, वॉल हँगिंग लाइट्स, लॅम्प, आकर्षक विद्युत रोषणाईच्या माळा आणि रांगोळी स्टिकर्सना पसंती मिळत आहे. यंदा केवळ घर सजवण्यापुरते मर्यादित न राहता थीमनुसार सजावट करण्याकडेही नागरिकांचा कल दिसून येत आहे.

दिवाळीचा सण जवळ आल्याने सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. घराच्या सजावटीसाठी विविध पर्याय शोधण्यापासून ते रंग संगतीनुसार साहित्याची निवड करण्यापर्यंत नागरिकांची लगबग सुरू आहे. झेंडूच्या माळा, फुलदाण्या, मोत्यांची तोरणे, राजस्थानी लटकन, रंगीबेरंगी पडदे, कागदी फुले आणि फॅन्सी कंदील अशा विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. पारंपरिक सजावटीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी नागरिकांकडून विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे.

यंदा सजावटीच्या साहित्यामध्ये विद्युत रोषणाईचे विविध प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. एलईडी लाइट्स, रंगीबेरंगी दिवे, लॅम्प, वॉल हँगिंग दिवे तसेच हॅप्पी दीपावली लिहिलेल्या विद्युत माळा उपलब्ध आहेत. घराचे प्रवेशद्वार, बाल्कनी आणि भिंती आकर्षक दिसाव्यात, यासाठी या साहित्याला पसंती मिळत आहे. जास्वंद, झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या माळांसह मोत्यांची तोरणे, शोपीस, फॅन्सी छत्र्या आणि विविध रंगांतील छोटे कंदीलही खरेदी केले जात आहेत. 'शुभ दीपावली' आणि 'हॅपी दिवाली'चे स्टिकर्स तसेच तयार रांगोळी स्टिकर्समुळे सजावटीला वेगळे स्वरूप देता येत असल्याने त्यांनाही मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT