Satara Robbery Case Pudhari
सातारा

Satara Robbery Case : अवघ्या 8 तासात जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल

Satara Robbery Case : रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या आठ तासांत झाला

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या आठ तासांत झाला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून 2 लाख 69 हजार 132 रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.

दि. 21 रोजी फिर्यादी अजय विठ्ठल गाडे (वय 37, रा. वडूज रोड माळ, रहिमतपूर) हे दुचाकीवरून जात असताना दुघी गावच्या हद्दीत संशयिताने लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडे यांची दुचाकी थांबवली. यानंतर अचानक संशयिताने त्यांना मारहाण करत गळ्यातील दीड तोळ्याहून अधिक वजनाची सोन्याची चैन लंपास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस हवालदार महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई सपोनि विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हवालदार सचिन माने, प्रविण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, हवालदार महेश देशमुख, दिपक देशमुख आणि तुषार काळंगे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT