कराड ः जप्त केलेल्या मुद्देमालासोबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस पथक. 
सातारा

Satara Crime : रिक्षा चोर निघाले अट्टल घरफोडे!

कराडात 9 गुन्हे उघडकीस; पुण्यातील महिलेसह दोघा संशयितांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहर व परिसरात रिक्षा चोरीसोबत 9 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पुण्यातील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा समावेश असून एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड शहर पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 13 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोन्याचे दागिने, रिक्षा, मोटरसायकल व इतर मुद्देमाल याचा यात समावेश आहे. रोहन सनी लोंढे (वय 22, रा. भारतनगर, पिंपरी पुणे) आणि तेजस्विनी अविनाश पाटील (वय 19, वाकड पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित एकत्रित वास्तव्यास होते अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

कराड शहरासह परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने विविध पातळ्यांवर शहर पोलिसांचा तपास सुरू होता. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सज्जन जगताप, संतोष पाडळे, संग्राम पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत पाठपुरावा करत संशयितांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT