पाटण, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 29 हजार 18 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 41.60 टीएमसी इतका झाला आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात धरणातील पाणी साठ्यात 2.51 टीएमसीने वाढ झाली आहे. तर पाणी उंचीत 4 फूट 1 इंच वाढ झाली आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात एकूण क्षमतेच्या 39.52 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 36.60 टीएमसी इतका तर धरणाची जळपातळी 639.039 मीटर झाली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच या 24 तासात कोयना येथे 51 मिलिमीटर तर आजवर 1 हजार 655 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 116 मिलीमीटर तर आजवर 2 हजार 378 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरमध्ये 86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आजवर एकूण 2 हजार 353 मिलिमीटर पाऊस झाला आहे.