Pusesawali news : पुसेसावळी येथील हॉटेलमध्ये गॅस गळती File Photo
सातारा

Pusesawali news : पुसेसावळी येथील हॉटेलमध्ये गॅस गळती

लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पुसेसावळी : पुसेसावळी, ता. खटाव येथील एका हॉटेलमध्ये गॅस गळती होवून अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच हॉटेल चालक जखमी झाला आहे.

बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी येथील एका हॉटेलमध्ये अचानक गॅस गळती झाल्याने आग लागली. हॉटेलमधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. काही क्षणांतच गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग भडकली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तत्काळ पोलिस व वीज वितरण कर्मचार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हॉटेल सुरू केलेल्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे हॉटेल मालकावर मोठा आर्थिक आघात झाला आहे. सचिन तुपे असे हॉटेल मालकाचे नाव आहे. यात सचिन तुपे हे जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT