Shambhuraj Desai 
सातारा

Shambhuraj Desai | पदवीधर निवडणुकीत महायुतीचेच काम करणार : ना. देसाई

महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून, राज्यातील सर्व जागा एकत्रितपणे लढवण्याची आमची भूमिका आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना ना. शंभूराज देसाई यांनी महायुती उमेदवारांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याला गेले आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये एकजूट आहे. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील यात शंका नाही.

राज्यात दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपये देणे, मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, थकीत वीज बिलामुळे वीजजोडणी खंडित न करणे आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करणे यांसह अन्य निर्णयांचा समावेश आहे, अशी माहिती ना. देसाई यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वनियोजित बैठका आणि कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महायुतीचे सर्व घटक पक्ष काम करत राहतील. पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असतानाही भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT