Pudhari event Pudhari
सातारा

Pudhari event: ‘पुढारी‌’ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या वतीने साताऱ्यामध्ये गुंतवणूक चर्चासत्र

बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान बळकट होत असताना, सर्वसामान्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान बळकट होत असताना, सर्वसामान्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. गुंतवणूकदारांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या संपत्तीत वृद्धी करण्यासाठी दैनिक मपुढारीफ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ‌‘म्युच्युअल फंड आणि आर्थिक साक्षरता‌’ या विषयावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सध्या बाजारपेठेत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र आपल्या उद्दिष्टांनुसार योग्य पर्यायाची निवड कशी करावी, याबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात संभम असतो. हाच संभम दूर करून, शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गुंतवणुकीला एक दिशा देणारे मार्गदर्शन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे झोनल मॅनेजर (इन्व्हेस्टर एज्युकेशन) शैलेंद्र दिक्षीत उपस्थित राहणार आहेत. ते म्युच्युअल फंड आणि आर्थिक नियोजनातील बारकाव्यांची माहिती गुंतवणुकदारांना देतील. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील.

या कार्यक्रमात आदित्य बिर्ला कॅपिटल म्युच्युअल फंड चे वरिष्ठ पदाधिकारी आणि नामवंत अर्थतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. वाढती महागाई आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे महत्त्व ते सांगणार आहेत.

बँका, विमा आणि इतर पारंपारिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे जाऊन आधुनिक गुंतवणुकीचे तंत्र समजून घेण्यासाठी हे चर्चासत्र एक उत्तम संधी आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आणि आर्थिक नियोजनाचा पाया मजबूत करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दैनिक मपुढारीफ आणि अइडङअचउ तर्फे करण्यात आले आहे. संपर्क : 9545327545, 8805007724. स्थळ : हॉटेल राधिका पॅलेस, राधिका रोड, सातारा. शनिवार दि. 7 मार्च 2026. संध्याकाळी 4.00 ते 7.00.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT