Makarand Patil File Photo
सातारा

Makarand Patil | खासगी वाटाघाटीतून जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला : ना. मकरंद पाटील

नोकरी, शिक्षण व पुनर्वसनाच्या लाभांचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने आपली जमीन उपलब्ध करून दिलेल्या भूमिधारकांना व त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण व पुनर्वसनाच्या लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा संपूर्ण राज्‍यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित झालेल्या जमिनींच्या मालकांना विविध सवलती व लाभ उपलब्ध होत होते. मात्र, सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना गती मिळावी, या उद्देशाने अनेक शेतकरी व भूमिधारकांनी खासगी वाटाघाटीद्वारे जमीन दिली असतानाही त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे या भूमिधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT