सातारा कारागृहात स्मार्ट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली. Pudhari Photo
सातारा

बंदिवानांना करता येणार नातेवाइकांना कॉल

जिल्हा कारागृहात स्मार्ट कार्ड सुविधेला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कारागृहातील न्यायाधीन व शिक्षा बंद्यांसाठी स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक बंद्याला त्याच्या रक्ताच्या नातेवाइकांशी व वकिलांशी बोलण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा प्रत्येकी 10 मिनिट असा फोन कॉल मिळणार आहे. यासाठी सातारा कारागृहात एकूण 4 स्मार्ट कार्ड फोन बसवण्यात आलेले आहेत.

बंद्यांना ही सुविधा त्यांच्या नातेवाइकांशी संपर्कात ठेवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी आहे. या सुविधेमुळे दूरवर तालुक्यामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये तसेच इतर राज्यांमध्ये राहणारे बंद्यांचे नातेवाईक यांना कारागृहापर्यंत येऊन नाव रजिस्टर करून मुलाखत होईपर्यंत थांबणे, वेळेचा व पैशाचा अपव्यवय टाळला जाणार आहे. या स्मार्ट कार्ड फोनमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा असून त्याची तपासणी वेळोवेळी होणार आहे. या फोन कॉलमधून बंद्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी व वकिलांशी संवाद साधून कौटुंबिक तसेच त्यांच्या केसबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे. या सुविधेचा गैरवापर झाल्यास त्याची शहानिशा करून संबंधित बंद्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद देखील ठेवण्यात आलेली आहे. ही सुविधा सातारा कारागृहात सुरु झाली असून यावेळी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, पोलिस दत्ताजी भिसे, वाघेश्वर गरुड, सुदाम बर्डे, राकेश पवार, बालाजी मुंडे, चेतन शहाणे, प्रशांत कदम, नानासाहेब डोंगळे, हेमंत यादव, गणेश सूळ, ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप बोराटे, चांद पटेल, संकेत जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT