सातारा : फलटण येथील संशयित आरोपी प्रशांत बनकर आणि पीडित मयत डॉक्टर युवतीशी खूप वेळा फोन कॉल झाले आहेत. पोलिस प्रशासन व्हॉटस्ॲप चॅटिंगचाही तपास करत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत बनकर आणि पीडित डॉक्टर यांच्यात बऱ्याच वेळा फोन कॉल झालेे आहेत. पीडित डॉक्टर यांची पोलिसाबद्दल तक्रार होती आणि पोलिसांनीदेखील आरोपीचे मेडिकल रिपोर्ट बनवण्यात पीडित महिला डॉक्टर सहकार्य करत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तक्रारीच्या दृष्टीनेदेखील तपास सुरू असल्याचे कडूकर यांनी सांगितले. मयत पीडित डॉक्टर युवतीने पोलिस सुरक्षेची मागणी केली आहे हे दिसून येत आहे.
असुरक्षित वाटू लागल्याने पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यासाठी हॉटेलचा सहारा घेतला आहे का? याबाबत तपास सुरू आहे. पीडित डॉक्टर युवतीचे बोलणे हे संशयित आरोपी प्रशांत बनकरशी खूप वेळा झाले आहेत. पोलिस प्रशासन व्हॉटस्ॲप चॅटिंगचाही तपास करत आहे. पोलिसांनी केलेली तक्रार ही प्रशासकीय आहे. पोलिस आणि वैद्यकीय अधिकारी नेहमी सहयोगाने काम करत असतात. मेडिकल ऑफिसरने दिवस आहे की रात्र हे बघू नये. आरोपीला अटक होण्यापूर्वी पोलिस प्रशासन दिवस आहे की रात्र आहे हे बघत नाही. अटकेपूर्वी आरोपी मेडिकल फीट आहे की नाही हे बघावं लागतं. पीडित मयत डॉक्टर सहकार्य करत नसल्याची तक्रार असल्याचेही वैशाली कडूकर यांनी सांगितले.