Dog Attack Pudhari
सातारा

Phaltan Stray Dog Attack|आईच्‍या कुशीतून कुत्र्यांनी बाळाला पळवले

चावे घेतल्‍याने बालिका ठार; कुटुंबीयांचा हलगर्जीपणा नडला

पुढारी वृत्तसेवा

फलटण : सर्वत्र दिवाळीचा माहोल आणि उत्‍साहाचे वातावरण असतानाच फलटणमध्‍ये कुत्र्याच्‍या हल्‍ल्‍यात अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. एका गाळ्यासमोर आई-वडील झोपले होते. आईच्‍या कुशीत विसावलेल्या मुलगी असलेल्या बाळाला पहाटेच्‍या सुमारास कुत्र्याने उचलून नेले. काही अंतरावर हे बाळ सकाळी मृतावस्थेत आढळले. शहरातील महात्‍मा फुले चौकात ही घटना घडली.

मयूर मुन्‍ना शिंदे (वय २२, रा. वाठार फाटा, ता. फलटण) हे घरकुलाच्‍या कामासाठी फलटण शहरात आले होते. मात्र, हे काम होईपर्यंत त्‍यांना वेळ लागला. त्‍यामुळे ते शहरातील महात्‍मा फुले चौकातील एका आईस्‍क्रीम गाळ्यासमोर झोपी गेले. यावेळी चिमुकलीच्‍या वडिलांनी मद्यपान केले होते. त्‍यातच त्‍या चिमुलकीचे आई-वडील हे चायनीजच्‍या गाड्यालगतच पहुडले होते. त्‍यांच्‍याजवळ याच चायनीजच्‍या खाद्यपदार्थाचे पार्सलही होते. मद्यपान केल्‍याने चिमुकलीच्‍या सुरक्षिततेकडे त्‍यांचे दुर्लक्ष झाले. त्‍यामुळेच शनिवारी मध्‍यरात्री ते पहाटेच्‍या सुमारास चायनीजच्‍या वासाने आलेल्‍या कुत्र्यांनी खाद्य म्‍हणून चिमुकलीला उचलून नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पहाटे ही गोष्‍ट आई-वडिलांच्‍या लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी शोधाशोध केली. यावेळी परिसरातच चिमुकली रक्‍तबंबाळ अवस्‍थेत आढळून आली. यानंतर त्‍यांनी तिला उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, कुत्र्यांनी चावा घेतल्‍याने अतिरक्‍तस्राव होऊन चिमुकलीचा मृत्‍यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. याप्रकरणी मयूर शिंदे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT