सातारा

Phaltan ganja seized: फलटणमध्ये चार किलो गांजा जप्त; दोघांना अटक

4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

फलटण : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत 4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई धुळदेव (ता. फलटण) येथे केली असून विक्रीसाठी हा गांजा आणला होता. याप्रकरणी दोघांना अटक केली.

अजित राजेंद्र कस्तुरे (31, रा. माळखांबी जि. सोलापूर), आदित्य रामचंद्र आतार (25 रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन व्यक्ती एमएच 12 एचएक्स 2649 या मोटारसायकलवरून धुळदेव हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सुमारे 4 किलो 69 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT