Crime News pudhari photo
सातारा

Phaltan Crime : विवाहितेला विषारी तणनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

कुरवली खुर्द येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथे कौटुंबिक वादातून विवाहित महिलेच्या तोंडात जबरदस्तीने विषारी तणनाशक ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा प्रभाकर घनवट (रा. माळवाडी, कुरवली खुर्द, ता. फलटण) यांना त्यांचे पती प्रभाकर हनुमंत घनवट व सासू जनाबाई हनुमंत घनवट हे जुन्या कौटुंबिक कारणावरून वारंवार मानसिक त्रास देत होते. घरातील वाद विकोपाला गेल्यानंतर तुझ्यामुळे घराचे वाटोळे झाले, असे म्हणत दोघांनी रेश्मा यांच्या तोंडात जबरदस्तीने विषारी तणनाशक ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर रेश्मा घनवट यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदविला. या प्रकरणी पती प्रभाकर घनवट याला अटक करण्यात आली असून सासूविरुद्धही पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय चव्हाण मॅडम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT