wall collapse Pudhari
सातारा

Satara News: ओझरेत शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

ओझरे (ता. जावली) येथे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

मेढा : ओझरे (ता. जावली) येथे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ही घटना घडली. शांताबाई बाबुराव लकडे (वय 65) असे या महिलेचे नाव आहे.

ओझरेमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी 5.30 च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंत अचानक कोसळली. याचवेळी त्या परिसरात असलेल्या शांताबाई लकडे यांच्या अंगावर ही भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रवीण मुगदुल, गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून प्रशासनाकडून मदत देण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT