सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी यासह मध्यम प्रकल्पात आजअखेर अवघा 15.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू असली तरी या पावसावर अपेक्षित साठा वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे धरण परिसरात पावसाचा आणखी जोर वाढला तरच धरणे ऑगस्टअखेर भरण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली आहे. सध्या रिमझिम सरी कोसळत असल्या तरी अजून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास पश्चिम भागात भात लागणीच्या कामांना वेग येईल. धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली असल्यामुळे धरणात पाणी साठा होण्यास मदत झाली आहे.
कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 73 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 13.89 टीएमसी असून 13.87 टक्के धरणात पाणी आहे. धोम धरण परिसरात 7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 2.75 टीएमसी असून 23.52 टक्के धरणात पाणी आहे. धोम बलकवडी धरण परिसरात 40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.11 टीएमसी असून 2.78 टक्के धरणात पाणी आहे.
तारळी धरण परिसरात 7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 1.22 टीएमसी असून 20.89 टक्के धरणात पाणी आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या नागेवाडी धरण परिसरात 4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.054 टीएमसी असून 25.71 टक्के धरणात पाणी आहे. मोरणा धरण परिसरात 23 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.669 टीएमसी असून 51.46 टक्के धरणात पाणी आहे. उत्तरमांड धरण परिसरात 15 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.280 टीएमसी असून 32.24 टक्के धरणात पाणी आहे. महू धरण परिसरात 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.693 टीएमसी असून 63.58 टक्के धरणात पाणी आहे. हातगेघर धरण परिसरात 10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.074 टीएमसी असून 29.60 टक्के धरणात पाणी आहे.
कण्हेर धरण परिसरात 6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 1.41 टीएमसी असून 14.70 टक्के धरणात पाणी आहे. उरमोडी धरण परिसरात 10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.60 टीएमसी असून 6.22 टक्के धरणात पाणी आहे.