जुळ्याचा जन्म 
सातारा

सातारा : जिल्ह्यात 42 प्रसूतीमागे होतोय एका जुळ्याचा जन्म

पुढारी वृत्तसेवा
विशाल गुजर

सातारा : जन्मणार्‍या प्रत्येक 42 बाळांमागे जुळी मुलं जन्माला येत आहेत. बहुतांश प्रमुख शहरांमध्ये हे प्रमाण त्यापेक्षा काहीसे अधिक असले, तरी उशिराने गर्भधारणा आणि आयव्हीएफसारख्या गर्भधारणेसाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे गतदशकापासून सातार्‍यामध्ये देखील जुळी अपत्य जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात 29 जुळे, दोन तिळे जन्मली आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ही आकडेवारी आहे.

कृत्रिम गर्भधारणेसाठी आयव्हीएफ, आयसीएसआय यासह ओव्हेरियन स्टिम्युलेशन यासारख्या प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. हेदेखील जुळ्यांचं प्रमाण वाढण्यामागचं एक मुख्य कारण आहे. या सर्व तंत्रज्ञानामुळे एकावेळी एकापेक्षा जास्त अपत्य जन्मण्याची शक्यता वाढते. मात्र, जुळ्या मुलांमध्ये बाल्यावस्थेत होणारा मृत्यूदर अधिक आहे. शिवाय, जुळे असल्यास गर्भावस्था, बाळंतपण आणि त्यानंतरही जुळ्या मुलांच्या वेळेचं बाळंतपणही गुंतागुंतीचं असतं. बरेचदा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होते, जन्माच्या वेळी बाळांचे वजनही कमी असण्याची समस्या तर बहुतांश प्रकरणांमध्ये दिसून येते. जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून जुळे, तिळे जन्माला येण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षभरात 29 जुळे आणि 2 तिळ्यांचा जन्म झाला. जुळ्या आणि तिळ्यांमध्ये जन्माच्या वेळी सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ सिझरचा पर्याय सुचवतात.

महिला आता पूर्वीपेक्षा उशिरा माता बनत आहेत. 30 वर्षांनंतर हे सामान्य आहे. दुसरे कारण म्हणजे आयव्हीएफ अर्थात कृत्रिम गर्भाधारणा सारख्या तंत्राचा अधिक वापर होतोय. अनेक स्त्रियांना उशिराने गर्भधारणा हवी असते. तसेच गर्भनिरोधाच्या साधनांचा वाढता वापर आणि एकंदरीतच प्रजननाची क्षमता कमी होणे, या बाबीदेखील उशिरा गर्भधारणेला कारणीभूत आहेत.
-डॉ. सुधीर कदम, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT