सातारा : सातारा शहर व वाई परिसरात घरफोड्या करणार्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक करण्यात आली. संशयित चोरट्यांकडून पोलिसांनी घरफोडीतील चोरीचे 23 लाख रुपये किंमतीचे तब्बल 24 तोळे सोने जप्त केले. दरम्यान, मुख्य संशयित सूत्रधार सांगली जिल्ह्यातील असून तो पसार झाला आहे.
दिपक संतोष पाटणे (वय 23, मूळ रा. वरवडी ता. भोर जि पुणे, सध्या रा. विंग ता. खंडाळा जि. सातारा), आशुतोष उर्फ पप्पू प्रदीप भोसले (वय 27, रा. बावधन ता. वाई जि. सातारा, सध्या रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, लोकेश सुतार (रा.लिंगनूर ता.मिरज जि.सांगली) याचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 19 जून रोजी भरदिवसा साक्षी हाईटस, वाई येथे चोरट्यांनी घरफोडी करुन सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. वाईसह सातारा शहर परिसरात देखील घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग (एलसीबी) तपास करत होते. एलसीबी पथकाने घटनास्थळी भेटी देवून तपास सुरु केला होता.