National Voters Day: जिल्ह्यात आज राष्ट्रीय मतदार दिवस Pudhari Photo
सातारा

National Voters Day: जिल्ह्यात आज राष्ट्रीय मतदार दिवस

गावोगावी घेणार मतदान शपथ : मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे. यादिवशी गावोगावी ग्रामस्थांना मतदान शपथ देण्यात यावी. जास्तीत मतदान करण्यासाठी गावोगावी जनजागृती करावी. याबाबतच्या सूचना सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्हा नोडल अधिकारी राहुल देसाई यांनी दिल्या आहेत.

मतदार जनजागृतीकामी लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे, तरुण मतदारांचा सहभाग वाढवणे, सुजाण, स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदानाचे महत्व मतदारांना समजावून सांगणे, मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क व कर्तव्य आहे .ही नागरिकांमध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त दि.25 जानेवारी रोजी सर्व कार्यालये सुरू ठेवून त्या-त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सक्रीय सहभागाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा. उपस्थित ग्रामस्थांना शपथ देण्यात यावी.

राष्ट्रीय मतदार दिवस, पहिल्यांदा मतदान कसे करावे व मतदार प्रतिज्ञा याचा गावातील, कार्यालयातील प्रत्येक नागरिकाने मोबाईलवर स्टेटस ठेवावेत. तसेच या कार्यक्रमाची अंमलबजावणी सर्व ग्रामपंचायत स्तरावर काटेकोरपणे करावी अशा सूचनाही ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी राहुल देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT