सरसकट पम्हसवड : म्हसवड शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या व्यापारी वर्गाला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त व्यावसायिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
म्हसवड शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाल्याने एसटी स्टँड परिसर शिंगणापूर चौक या भागातील व्यापारीवर्गांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी म्हसवड शहराला भेट देऊन नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भेटी देऊन दिलासा दिला. दरम्यान, उपस्थित अप्पर तहसीलदार मीना बाबर, मुख्याधिकारी डा. सचिन माने यांना व्यापारी वर्गाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सरसकट करावेत, अशा सूचना दिल्या. यावेळी अभय जगताप, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, बाळासाहेब माने, परेश व्होरा, जय राजेमाने आदी उपस्थित होते.