मोटार सायकली व विहिरीवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीच्या लोणंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या.   Pudhari News Network
सातारा

लोणंद येथे दुचाकी, विहिरीवरील मोटारी चोरी करणारी टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : मोटार सायकली व विहिरीवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीच्या लोणंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पाच पैकी दोन चोरट्यांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

धीरज संजय गिरी (वय २६, रा. बोरी, ता. खंडाळा), अनिकेत जालिंदर येळे (वय २१, रा. ठोंबरे मळा, लोणंद), रोहित सदानंद शेळके (वय २१, रा. निंबोडी, ता. खंडाळा) , ओम प्रकाश माने (वय २०, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे), जयेश आनंदा मलगुंडे (वय २६, रा. कापडगाव, ता. फलटण), ओम मोहीते (रा. तांबवे, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी मोटार सायकल चोरीचे २ व विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जयेश मलगुंडे, ओम मोहिते फरारी आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, अभिजित घनवट, संजय बनकर यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT