पाटण : लग्न करण्यास नकार देणाऱ्या युवतीशी असभ्य वर्तन करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षाने तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुभम उबाळे असे त्याचे नाव आहे. लग्न का करत नाहीस असे म्हणत मोबाईलवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी संशयिताने या युवतीला दिली होती. त्याचबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा ठपका कोयनानगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात ठेवण्यात आला आहे.
याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पाटण परिसरातील शुभम उबाळे याने एका युवतीकडे जबरदस्तीने लग्न करण्याचा तगादा लावला होता. तसेच वाईट हेतूने स्पर्श करत त्याने तिला मारहाण केली. संबंधित युवतीचा पाठलाग करून मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.