लोणंद : अंदोरी, ता. खंडाळा येथील एका 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती ठेवल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जीवन रवींद्र गायकवाड (वय 24, रा. कानगाव ता. दौंड, जि. पुणे सध्या रा. अंदोरी, ता. खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंदोरी ता. खंडाळा येथील एकाकडे जीवन गायकवाड हा चालक म्हणून काम करत होता. याच कुटुंबाकडे तो राहायला होता. ओळखीचा फायदा घेत त्याने तेथील अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. यामध्ये ती 8 महिन्यांची गरोदर राहिली आहे. याबाबत कोणाला सांगितले तर मारहाण करण्याची धमकीही संशयिताने पिडीतेला दिली होती. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने लोणंद पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि सुशिल भोसले व सहकार्यांनी संशयीत जीवन गायकवाड याला अटक केली आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक राहुल धस व सपोनि सुशील भोसले यांनी भेट दिली. याप्रकाराने अंदोरी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जे. एच. चव्हाण करत आहेत.