म्हसवड : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली.
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या घरून वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींची दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी रथातून मिरवणुकीस सुरू झाली. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा आहे.
यावेळी अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, फलटण एज्युकेशन गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड. पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराव राजेमाने, गणपतराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, ॲड. विश्वजित राजेमाने, श्री सिद्धनाथ मंदिराचे मानकरी मोहनराव शिदोजीराव डुबल, प्रमोद शिदोजीराव डुबल, हर्षवर्धन मोहनराव डुबल, किसनराव शामराव डुबल, राजवर्धन मोहनराव डुबल, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, पोलिस उपविभागीय अधिकारी रणजित सावंत, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि अक्षय सोनवणे यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ पडला.
अनेक ठिकाणच्या मानाच्या सासनकाट्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या होत्या. या सासनकाट्या रथास भेटवण्यात आल्या. श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून शुक्रवार दि. 21 रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला. रथ नगरप्रदक्षिणेस पूर्वीप्रमाणे माणगंगा नदीपात्रातून नेण्याऐवजी नदीत पाणी असल्याने बायपास मार्गे नगरपालिका विठ्ठल रूक्मिणी मंदिर, महात्मा फुले चौक ते बसस्थानक या मार्गे सुरुवात झाली. भाविकांनी ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात रथावर गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती.
रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ पारंपरिक पद्धतीने नदीपात्रालगत बायपास रस्त्यावरुन ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वडजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालयाच्या पुढे लक्ष्मीआई, मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या.
म्हसवड पोलिस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक यांच्यासह 15 पोलिस अधिकारी, 150 पोलिस कर्मचारी, 35 महिला अधिकारी, 30 पोलिस पाटील, 125 होमगार्ड, 250 स्वयंमसेवक, सपोनि अक्षय सोनवणे, आपत्कालीन पथक यांचा समावेश होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सौ. सोनिया गोरे, माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप अनिल देसाई, विजय सिन्हा, इंजि.सुनिल पोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष परेश व्होरा, माण खटाव तालुक्याचे लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष आप्पासो पुकळे, डॉ.जयवंत गलंडे, डॉ.चेतन गलंडे, काकासाहेब माने, विजय धट, करण पोरे, योगेश जंगम, आकाश विरकर, अशोकराव शिंदे, ॲड. शुभम पोरे, श्रीकांत विरकर, बाळासाहेब पानसांडे, अमोल तोरसे-पाटील, अंकुश अबदागिरे, चंद्रकांत पिसे, शंकर विरकर, संग्राम बनसोडे-पाटील, दिनेश शिंदे, धनाजी पिसे, विजय भागवत, संजय भागवत, आकाश पानसांडे, बाळासाहेब पिसे, इंजि.दादासो दोरगे, रामदास मासाळ, दिनेश शिंदे, समर्थ जाधव यांनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण केली.
प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, डीवायएसपी रणजित सावंत, तहसिलदार विकास अहिर, अप्पर नायब तहसीलदार मीना बाबर, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, सपोनि अक्षय सोनवणे, पीएसआय अनिल वाघमोडे, गोपनीय विभागाचे अभिजीत भादुले, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष शहाजीराव बनगर म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, चैतन्य देशमाने, नितीन तिवाटणे, नायब तहसीलदार पुरवठा, विभाग खुशबू चौधरी, पुरवठा निरिक्षण एम. बी. जाधव यांनी रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.