सातारा

Mahabaleshwar Hotel Accident: हॉटेलच्या पायऱ्यांवरून पाय घसरून कामगाराचा मृत्यू

महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील माऊंटन ब्रीज हॉटेलमध्ये गादी आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचा पावसामुळे ओल्या झालेल्या जिन्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील माऊंटन ब्रीज हॉटेलमध्ये गादी आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याचा पावसामुळे ओल्या झालेल्या जिन्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.

पांडुरंग ऊर्फ बापू कोंडिबा चव्हाण (वय ४३, रा. केळघर, ता. जावली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, मेटगुताड येथील माऊंटन ब्रीज हॉटेलमध्ये चव्हाण गेल्या काही वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होते. सध्या वीकेंडसह सलग सुट्ट्या असल्याने हॉटेलमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती.पावसामुळे जिन्यावर पाणी साचले होते. चव्हाण हे हॉटेलमध्ये गादी आणण्यासाठी गेले होते. या जिन्यावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT