sleep disorders AI-generated image
सातारा

Melatonin Imbalance: मोलाटोनीन हार्मोनच्या असंतुलनामुळे वाढल्या निद्रानाशाच्या तक्रारी

आहार-विहाराचा परिणाम; महिलांमध्ये अपुर्‍या झोपेमुळे मधुमेह, उच्चरक्तदाबासह हृदयविकाराचा धोका बळावतोय

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : मानवी शरीरात निसर्गत: एक जैविक घड्याळ असते. ते दिवस-रात्रीच्या चक्राशी जोडले असल्याने रात्री गाढ झोप मिळवून देणारे मेलाटोनीन हे हार्मोन मेंदू रात्रीच्या वेळी तयार करतो. मात्र आहार-विहाराच्या सवयींबरोबरच या जैविक घड्याळाचे कामकाज कोलमडल्याने मेलाटोनीनचे असंतुलन होत असून अनेकांना निद्रानाशाची समस्या उद्‌भवत आहे. विशेषत: महिलांमध्ये अपुर्‍या झोपेमुळे मधुमेह, उच्चरक्तदाबासह हृदयविकाराचा धोका बळावत आहे.

मेलाटोनीन हा एक नैसर्गिक संप्रेरक असून ते मेंदूतील पिनियल ग्रंथीद्वारे तयार होते. हे संप्रेरक शरीराला अंधारात झोपण्याची वेळ झाल्याची जाणीव करून देते व झोपेचे चक्र नियंत्रित करते. बदलत्या राहणीमानात स्मार्ट फोन, लॅपटॉप या दैनंदिन वापराच्या गोष्टी बनल्या आहेत. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनचा अतिवापर, उशिरापर्यंत उजेडात राहणे किंवा काम करण्यामुळे मेलाटोनीन तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

मेलाटोनिन असंतुलनाने मेंदूला झोपण्याचे योग्य संकेत मिळत नाहीत. परिणामी झोप न लागणे, अपुरी झोप मिळणे यांसारख्या निद्रानाशाच्या समस्या निर्माण होतात. निद्रानाशामुळे शरीराचे जैविक घड्याळही कोलमडून अपचन, पित्त यांसह आरोग्य विविध तक्रारी भेडसावत आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे आजार बळावून आरोग्यविषयक गुंतागुंत वाढत आहे. चिडचिडेपणा, निरुत्साहामुळे मानसिक स्थास्थ्यही हिरावत आहे.

मेलाटोनीनच्या गोळ्यांचा अतिवापर धोकादायक

काही जण झोप येण्यासाठी मेलाटोनीनच्या गोळ्या वापरतात दीर्घकालीन निद्रानाशाने ग्रस्त प्रौढांमध्ये एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ मेलाटोनीनच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका तसेच मृत्यूचाही धोका वाढतो. झोपण्याच्या किमान एक ते दोन तास आधी मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनपासून लांब राहावे, रात्री उशिरापर्यंतचे जागरण टाळावे, दररोज एकच वेळ झोपण्याची व उठण्याची सवय ठेवावी.

मेलाटोनीन वाढण्याची कारणे

मोबाईल, टीव्ही आणि संगणकाचा वापर.

दिवसा सूर्यप्रकाश कमी मिळणे.

रात्री उशिरापर्यंत जागरण.

शिफ्ट ड्युटी/रात्रीची नोकरी.

मेलाटोनीन सप्लिमेंटचा अनियंत्रित वापर.

शरीराबरोबरच मन व मेंदूलाही स्वास्थ्य आवश्यक आहे. त्यासाठी कमीत कमी ७ तास झोप आवश्यक आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात निद्रानाशाची समस्या उद्‌भवत असली तरी मोनोपॉज व हार्मोन्सच्या असंतुलनामुळे तो महिलांमध्ये अधिक जावणतो. रात्रीचा आहार कमी घ्यावा, नियमित ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम तसेच हृदय, मेंदू व शरीराच्या सर्व अवयवांना आवश्यक फास्ट वॉकिंगचा व्यायाम आठवड्यातून किमान ५ दिवस करणे आवश्यक आहे.
- डॉ. सुरेश शिंदे, एमडी मडिसिन, हृदयविकार तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT