Gold shop fire: शॉर्टसर्किटमुळे सोन्याच्या दुकानाला भीषण आग File Photo
सातारा

Gold shop fire: शॉर्टसर्किटमुळे सोन्याच्या दुकानाला भीषण आग

सुमारे तीन लाखांचे नुकसान; कराडमधील घटना

पुढारी वृत्तसेवा

कराड : शहरातील आझाद चौक, शिवम संकुल, रविवार पेठ येथे असलेल्या सोन्या-चांदीच्या आटणी दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

संतोष वसंत शिर्के (वय 35, रा. शिवाजीनगर, कडेगाव) यांचे हे दुकान असून ते गेल्या 2011 पासून व्यवसाय करीत आहेत. दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक शरद मुळे यांनी शिर्के यांना फोनद्वारे माहिती दिली. तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर नागरिकांच्या मदतीने कुलूप तोडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत चांदीच्या पाण्याच्या बादल्या, वजनकाटा, लाकडी कपाट, घडवणीचे साहित्य आदी जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून नेमके कारण तपासण्याची मागणी शिर्के यांनी पोलिसांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT