मांढरदेव : महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सोमवारी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. ‘माझी सावळी काळूबाई, पावती नवसाला’ अशा भक्तीगीतांनी मांढरगडावरील वातावरण बहरुन गेले आहे. ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात वाद्यांच्या गजरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर श्री काळुबाई देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
श्री काळुबाई देवीची पूजा अर्चा करून पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. मांढरदेव देवस्थानचे विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, ट्रस्टचे विश्वस्त सुनील मांढरे, चंद्रकांत मांढरे, विजय मांढरे, सुधाकर गुरव, ओंकार गुरव, ग्रामस्थ, पुजारी, भाविक यांच्या उपस्थितीत घटस्थापना व आरती करण्यात आली.
दुसर्या माळेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुले राहील. देवीला येणार्या भाविकांसाठी मांढरदेव देवस्थान ट्रस्टमार्फत तत्काळ दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये देवस्थान ट्रस्टमार्फत भजन, गायन अशा सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान मार्फत पोलीस बंदोबस्त, कमांडो, दवाखाना,अॅ म्बुलन्स यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मांढरगडावर धुक्याचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांनी वाहने व्यवस्थित चालवावीत, असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आलेले आहे. देवीचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांनी, गावकर्यांनी, व्यवसायिकांनी व्यवसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान मार्फत करण्यात आलेले आहे.