सातारा

Makrand Patil | स्थानिक स्वराज्यसाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे : ना. मकरंद पाटील

साताऱ्यात आढावा बैठक, तालुकानिहाय घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन कामाला सुरुवात करावी. ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची असून जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम सुरू करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक हॉटेल लेक व्ह््यू येथे मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. सचिन पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, शिवरुपराजे खर्डेकर, प्रतापराव पवार, किसनराव शिंदे, सीमा जाधव, नितीन भरगुडे- पाटील, प्रमोद शिंदे, मनोज देशमुख, शिवाजीराव महाडिक, मनोज पोळ, उदय कबुले, सुरेंद्र गुदगे, दत्ता नाना ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, प्रदीप विधाते, नितीन भिलारे, किरण साबळे पाटील, अर्जुन खाडे, पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री ना. मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. आता आपण पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अनेक अनुभवी नेत्यांना आपल्या सोबत घेत आहोत. आगामी काळात आणखी काही लोक आपल्या सोबत येणार आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वांनी एकजुटीने कामाला सुरुवात करायला हवी, जेणेकरून पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यास मदत होईल. ज्या तालुक्यात अद्याप आपले पदाधिकारी सक्रिय झाले नाहीत, त्यांनी तातडीने सक्रिय व्हावे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाचे ध्येयधोरणे व घेतलेले महत्वपूर्ण निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावे.

प्रास्ताविकात बाळासाहेब सोळसकर यांनी पक्षाची वाटचाल आणि जिल्ह्यात सुरू असलेली पक्ष प्रवेश आणि संघटना बांधणीचा आढावा घेताना सर्वांनी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. श्रीनिवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले. यावेळी किसनराव भिलारे, प्रवीण भिलारे, महादेव मस्कर ,सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, सुनील शिंदे, नासीर मुलाणी, विजयसिंह यादव, पृथ्वीराज गोडसे, राजेंद्र तांबे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT