सातारा

मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी 5 कोटी : आ. महेश शिंदे

Arun Patil

कोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव मतदारसंघातील मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सामाजिक न्यायमंत्री ना. सुरेश खाडे यांनी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

कोरेगाव तालुक्यासाठी 1 कोटी 95 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक सातारारोडसाठी 1 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या निधीतून गावातील प्रमुख चौकापासून ते बौध्द वस्तीकडे जाणारा रस्ता, बंदिस्त गटारे बांधली जाणार आहे. तसेच रस्ता ट्रिमिक्स व काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी एकंबे व शिरंबेसाठी प्रत्येकी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. याचबरोबर चिमणगाव, भोसे व अंबवडे संमत कोरेगाव येथील बौध्द वस्तीसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खटाव तालुक्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले असून खटाव गावासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर बुधसाठी 30 आणि वेटणेसाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सातारा तालुक्यासाठी 1 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये संभाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक 4 व 5 मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. खेडसाठी 20 लाख, महागावसाठी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्यातील 14 कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात तातडीने 30 टक्केनिधीची रक्कम म्हणून दीड कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT